कैरीचे पन्हे तयार करायची पध्दत व फायदे

 

कैरीचे पन्हे तयार करायची पध्दत व फायदे

Recipe and Benefits of Raw Mango Kairiche Panhe Juice

साहित्य

दिड कप कैरीचा गर

२ कप साखर

१ चमचा वेलची पूड

चिमूटभर केशर

 

कृती

साधारण २ मोठया कैरी कूकरमध्ये शिजवून घ्यावी.

थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा.

चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.

साखर पातेल्यात घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी (१/२ ते ३/४ कप)घालून गोळीबंद पाक करावा.

पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. त्यात केशर आणि वेलचीपूड घालावी.

कैरीचा गर घालावा. ढवळून घ्यावे. मिश्रण थंड झाले कि काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.

एक ग्लासमध्ये २-३ टेस्पून मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.

 

टीप :

शक्यतो कैरी आंबट असावी. जर कैरी आंबट नसेल तर त्याप्रमाणे साखर कमी करावी. तसेच कमी आंबट कैरीचे पन्हे पिताना थोडे लिंबू पिळावे. सर्व्ह करताना किंचीत मिठ घातले तरी छान चव येते

 

फायदे :

उष्मघातापासून अराम मिळतो. उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी पन्हे फादेशीर आहे. कैरीचे पन्हे शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्यावे. कैरी मध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे एजिंगची समस्या कमी होण्यास मदत होते. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कैरी पन्हे प्यावे. कैरीमध्ये पोटॅशियमचा मोठया प्रमाणात साठा असतो. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास खूपच मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते व हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो. कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात एसिडिटी, पित्ताचा किंवा मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून कैरीचे पन्हे पिणे लाभदायक आहे.